त्या कोणाला खुश करताय ते… ; नितेश राणेंची सुप्रिया सुळेंवर टीका
खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या "मी मटण खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं" या विधानावर मंत्री नितेश राणे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
मी मटण खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हंटलं आहे. त्यानंतर आता सत्ताधारी नेत्यांनी त्यांच्यावर टीका करायला सुरवात केली आहे. मंत्री नितेश राणे यांनी यावर आता भाष्य करत टीका केली आहे. सुप्रिया सुळे कोणाला खुश करत आहेत, ते जगजाहीर आहे, असं राणे यांनी म्हंटलं आहे. तसंच ही हिम्मत दुसऱ्या धर्माविषयी करा, असं थेट आव्हानचं त्यांनी सुळे यांना केलं आहे.
यावेळी बोलताना मंत्री नितेश राणे यांनी म्हंटलं की, हिंदू धर्माची हीच विशालता आहे. कोणी मटण मासारी खावा कोणाची कसली बंदी नाही… हिंदू धर्माच्या पालन करण्याचे लोक आहेत त्यांनी आपापल्या सण आपलं आपण ठरवावं. सुप्रिया सुळे सात ही दिवस मटण खात असल्या तरी तो त्यांचा प्रश्न आहे. सुप्रियाताई लव जिहादच स्वागत करतात. त्या हिंदू धर्म पांडुरंगाच्या बाबतीत कोणाला खुश करायचा प्रयत्न करतात, हे जगजाहीर आहे. आमच्या मंदिरात जाताना अशा पद्धतीने अपमानित शब्द वापर असतील तर वारकरी समूहा सह प्रत्येक जणांनी आपला रोष दाखवला पाहिजे. हिंदू धर्मासारखं त्यांनी इतर धर्म साठी असं काही बोलून किंवा करून दाखवावं. दुसऱ्या धर्मासाठी अशी भाषण केलं तर चिरफाड होईल. ही मस्ती फक्त आमच्या हिंदू धर्माबद्दल बोलताना होते त्यांनी ही मस्ती करू नये, असं थेट आव्हानचं राणेंनी सुळे यांना केलं आहे.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?

