सुरेश धसांच्या आष्टीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन पण निमंत्रण असताना धनंजय मुंडेंची दांडी, कारण नेमकं काय?

सुरेश धसांच्या आष्टीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन पण निमंत्रण असताना धनंजय मुंडेंची दांडी, कारण नेमकं काय?

| Updated on: Feb 05, 2025 | 1:31 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना निमंत्रण देण्यात आलं. पंकजा मुंडे कार्यक्रमाला हजर राहणार असल्याची माहिती भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली. मात्र धनंजय मुंडे या कार्यक्रमाला गैरहजर राहणार असल्याचे समोर येत आहे.

बीड जिल्ह्यातील आष्टी उपसा सिंचन क्रमांक ३ शिंपोरा ते खुंटेफळ पाइपलाइन कामाची पाहणी, बोगदा कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना निमंत्रण देण्यात आलं. पंकजा मुंडे कार्यक्रमाला हजर राहणार असल्याची माहिती भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली. मात्र धनंजय मुंडे या कार्यक्रमाला गैरहजर राहणार असल्याचे समोर येत आहे. दरम्यान, सातत्याने बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकऱणात धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या सुरेश धसांनी आष्टीतील उपसा सिंचन योजनेच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण धनंजय मुंडे यांना दिलं होतं. मात्र धनंजय मुंडे हे आपल्या डोळ्यांच्या ऑपरेशनमुळे कार्यक्रमाला गैरहजर राहणार असल्याची माहिती स्वतः सुरेश धस यांनी दिली. या उद्घाटन सोहळ्यापूर्वी सुरेश धस यांच्याकडून आष्टीतील कार्यक्रमस्थळी पाहणी कऱण्यात आली. यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सुरेश धस म्हणाले, ‘आष्टी उपसा सिंचन माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. तीनशे ते चारशे वर्षांचा आमचा दुष्काळी भाग आहे. जो शिवकालीन असून इतिहासातही आष्टी, पाटोदा, शिरूर, पाथर्डी आणि नगर हे तालुके कमी पावसाच्या पाण्याचे आहेत, दुष्काळ पडला की, टॅकर-छावण्या ज्याने आम्ही वैतागलो होतो. आता मुख्यमंत्र्यांच्या रूपाने आम्हाला पाणी मिळणार असल्याने आम्ही सुखी होऊ’, असे धस म्हणाले.

Published on: Feb 05, 2025 01:31 PM