Suresh Dhas : ‘…त्यात तोंड घालू नका’, सुरेश धस अंजली दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
बीडच्या आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस हे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि तृप्ती देसाई यांच्या प्रतिक्रियेवर बोलताना काही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
खोक्या भोसले प्रकरणात व्हिलन ठरवून माझ्या खुनाचा कट रचण्यात आला असल्याचा गंभीर आरोप बीडच्या आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी नुकताच केला. सुरेश धस यांनी केलेल्या आरोपांनंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान, सुरेश धस यांनी केलेल्या गंभीर आरोपांवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि तृप्ती देसाई यांनी प्रतिक्रिया देऊन सुरेश धस यांना चांगलंच हल्लाबोल केला. अंजली दमानिया आणि तृप्ती देसाई यांनी सुरेश धसांचे आरोप एक स्टंटबाजी असल्याचे म्हटले. अशातच सुरेश धस यांनी यावर प्रतिक्रिया देत असताना अंजली दमानिया आणि तृप्ती देसाई यांना फटकारल्याचे पाहायला मिळाले. ‘अंजली दमानिया आणि तृप्ती देसाई यांना बीड जिल्ह्यातील राजकारणातील खाचा-खोचा काही माहिती नाही. त्यांनी कशावर काय बोलावं… ते काहीही बोलतात… खोक्याच्या प्रकरणात सुरेश धस अडचणीत आले असं म्हणतात. माझा खोक्या प्रकरणाचा काहीही संबंध नाही’, असं वक्तव्य करत सुरेश धस अंजली दमानिया आणि तृप्ती देसाई यांच्यावर बोलताना काहीसे भडकल्याचे पाहायला मिळाले. बघा काय म्हणाले सुरेश धस?
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं

