… आता चित्रा वाघ यांनीही आता संजय राठोडांची दीदी व्हावं, सुषमा अंधारेंचं झोंबणारं वक्तव्य!

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आमदार संजय राठोड यांच्याविरोधात एकेकाळी आक्रमक झालेल्या भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी नरमाईचं धोरण स्वीकारलं आहे

... आता चित्रा वाघ यांनीही आता संजय राठोडांची दीदी व्हावं, सुषमा अंधारेंचं झोंबणारं वक्तव्य!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 11, 2022 | 5:43 PM

मुंबईः भाजपमध्ये गेल्यावर सगळे विषय संपून जातात. आता संजय राठोड (Sanjay Rathod) हेदेखील सत्तेत भाजपसोबत गेल्याने त्यांचा विषय़ संपणार असं वक्तव्य शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केलंय. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेना आमदार संजय राठोड यांच्याविरोधात एकेकाळी आक्रमक झालेल्या भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी नरमाईचं धोरण स्वीकारलं आहे. भाजपसोबत सत्तेत आल्याने चित्रा वाघ यांनी अचानक यु टर्न घेतल्याचं म्हटलं जातंय. यावरून आज एका पत्रकाराने प्रश्न विचारला असता चित्रा वाघ चांगल्याच भडकल्या. यावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली.

सुषमा अंधारे म्हणाल्या, भाजपमध्ये गेलं की सगळे विषय संपून जातात. देवेंद्र फडणवीसजी जेव्हा बोलतात तेव्हा आंदोलनं होतात. जेव्हा बोलतात तेव्हा आंदोलनं संपतात. संजय राठोडला क्लीन चीट कुणी दिली? आमच्या भावनाताई मोदी साहेबांच्या बहीण झाल्या. तसं आता चित्राताई संजय राठोड यांच्या दीदी झाल्या पाहिजेत, असा टोमणा सुषमा अंधारे यांनी लगावलाय. देवेंद्र फडणवीस हे द्वेषपूर्ण राजकारण करतायत, त्यांनी एकदा विचार केला पाहिजे, असा सल्ला सुषमा अंधारे यांनी दिलाय.

हर हर महादेव चित्रपटाविरोधातील आंदोलनामुळे जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली. यावरून सुषमा अंधारे यांनी सरकारचा तीव्र निषेध केला आहे. हे साहित्याचं विकृतीकरण आहे. हे चित्रपटांतून विकृतीकरण सुरु आहे. खरं तर राज ठाकरेंसारख्या नेत्याने यात व्हॉइस ओव्हर करताना विचार करायला हवा होता, असं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलंय.

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर आरोप केलेत. शरद पवार हे जादूटोणा करतात, त्यांनीच उद्धव ठाकरे यांना वश केलं. त्यांच्या ताब्यात आलेले लोक संपून जातात, असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलंय. यावर सुषमा अंधारे म्हणाल्या, बावनकुळे यांनी आरसा पाहून वक्तव्य केलंय. देंवेंद्र फडणवीस हेच जादूटोणा करतात..

Non Stop LIVE Update
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.