महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
सुषमा अंधारे यांनी नांदेडमधील एका मोठ्या आर्थिक फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. बिल्डर विक्रम चाकणकर याने अनेक महिलांसह नागरिकांना ७० कोटी रुपयांहून अधिक रकमेला फसवल्याचा आरोप त्यांनी केला. विशेष म्हणजे, या प्रकरणी महिला आयोग आणि स्थानिक पोलिसांकडून पीडितांना मदत मिळण्याऐवजी, त्यांनाच त्रास दिला जात असल्याचा धक्कादायक दावा अंधारे यांनी केला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एका पत्रकार परिषदेत नांदेडमधील एका मोठ्या आर्थिक फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. त्यांनी बिल्डर विक्रम चाकणकर याच्यावर अनेक लोकांकडून, विशेषतः महिलांकडून, ७० ते ८० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला.
अंधारे यांनी वर्षा दमिष्टे, शीतल शिंदे आणि सचिन सुर्वे या तीन पीडित व्यक्तींना समोर आणत त्यांची व्यथा मांडली. रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करून दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून चाकणकरने करोडो रुपये उकळले, मात्र ना गुंतवणूक परत मिळाली ना फ्लॅट मिळाले. पीडितांनी पैसे परत मागितल्यावर त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे, पीडितांना न्याय मिळण्याऐवजी, नांदेड सिटी पोलिसांनी चाकणकर आडनाव ऐकताच हस्तक्षेप करून पीडित महिलांवरच सावकारकीचे खोटे गुन्हे दाखल केले. महिला आयोगही पीडितांना मदत करण्याऐवजी, उलट त्यांच्यावरच खोट्या केसेस टाकण्यासाठी पुढे येत असल्याचा गंभीर आरोप अंधारे यांनी केला आहे. रूपाली निलेश चाकणकर यांच्या पदाचा गैरवापर करून हे घडत असल्याचे पीडितांचे म्हणणे आहे.
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी

