Special Report | संजय शिरसाट यांच्या क्लीनचिटवर सुषमा अंधारे यांचा सवाल
VIDEO | संजय शिरसाट यांच्या क्लीनचिटवर सुषमा अंधारे यांचा सवाल, काय आहे प्रकरण?
मुंबई : शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांना औरंगाबाद पोलिसांकडून क्लीनचीट मिळालेली आहे. यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सवाल उपस्थित केलाय. पोलिसांनी माझी बाजू ऐकूनच घेतली नाही मग क्लीनचीट कशी दिली, असा सवालच अंधारे यांनी केलाय. ‘सत्तार भाऊ माझेच, भुमरे भाऊ पण माझेच, काय काय लफडी केली तिलाच माहित’, याच वक्तव्यावरून संजय शिरसाट यांना क्लीनचीट मिळाली आहे. पोलिसांनी अहवाल सादर करत शिरसाट यांचं प्रकरण विनयभंग या प्रकरणात येत नसल्याचे म्हटले आहे. सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाट यांची औरंगाबाद पोलिसांत तक्रार केली होती. यानंतर त्यांनी राज्य महिला आयोगातही धाव घेतली. महिला आयोगानं पोलिसांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत. त्यानंतर औरंगाबाद पोलिसांनी महिला अधिकाऱ्याची समिती नेमली. शिरसाट यांनी उल्लेख केलेला व्यक्ती समोरच नव्हता. त्यामुळे ते प्रकऱण विनयभंगाच्या केसमध्ये येत नसल्याच पोलिसांनी म्हटले. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..

