AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | बोट भरकटली की दहशतवादी प्लॅन?

Special Report | बोट भरकटली की दहशतवादी प्लॅन?

| Edited By: | Updated on: Aug 19, 2022 | 12:32 AM
Share

या बोटीचं नाव लेडी हान असून बोटीची मालकी ऑस्ट्रेलियन महिलेची आहे. या बोटीचा कॅप्टन महिलेचाच पती आहे. ही बोट मस्कतवरुन यूरोपला जात होती. या बोटीला नेपच्यून मेरिटाईम कंपनीनं खासगी सुरक्षा दिली होती. मात्र 26 जूनला बोटीचं इंजिन खराब झालं त्यानंतर कोरियन युद्धनौकेनं या बोटीवरील खलाश्यांची सुटका केली. समुद्र खवळलेला असल्यानं बोटीचं टोईंग करता आलं नाही आणि समुद्रातल्या प्रवाहामुळं ही बोट भरकटत हरिहरेश्वरच्या समुद्रात आली.

मुंबई : मुंबईपासून काहीच अंतरावरच, समुद्रात या बोटीत शस्त्र सापडल्यानं खळबळ उडाली. रायगडच्या( raigad) हरिहरेश्वरमध्ये मच्छिमारांना आधी एक संशयास्पद बोट(suspicious ship ) दिसली आणि त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी या बोटीतून 3 एके 47 रायफल्स आणि काडतुसं जप्त केलीत. माहिती मिळताच, ATSची टीमही घटनास्थळी दाखल झाली. तसंच कोस्ट गार्डच्या जवानही हेलिकॉप्टरच्या साहाय्यानं बोटीवर दाखल झाले. ही बोट खडकावर अडकली होती. बोटीची जवानांनी पाहणी केली आणि त्यानंतर बोटीला किनाऱ्यावर आणलं. मात्र प्राथमिक चौकशीनंतर या बोटीबद्दल गृहमंत्री फडणवीसांनी सभागृहात खुलासा केला.

या बोटीचं नाव लेडी हान असून बोटीची मालकी ऑस्ट्रेलियन महिलेची आहे. या बोटीचा कॅप्टन महिलेचाच पती आहे. ही बोट मस्कतवरुन यूरोपला जात होती. या बोटीला नेपच्यून मेरिटाईम कंपनीनं खासगी सुरक्षा दिली होती. मात्र 26 जूनला बोटीचं इंजिन खराब झालं त्यानंतर कोरियन युद्धनौकेनं या बोटीवरील खलाश्यांची सुटका केली. समुद्र खवळलेला असल्यानं बोटीचं टोईंग करता आलं नाही आणि समुद्रातल्या प्रवाहामुळं ही बोट भरकटत हरिहरेश्वरच्या समुद्रात आली.

सुरुवातीच्या तपासानंतर, दहशतवादी अँगल समोर आला नाही. पण ATSकडून त्याही अँगल तपास सुरु आहे आणि रायगडच नाही, तर मुंबई पुण्यासह मोठ्या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. याआधी 26/11च्या मुंबईतल्या हल्ल्यांसाठी कसाबसह इतर दहशतवादी पाकिस्तानातून समुद्रमार्गेच बोटीनं आले होते.  आता याही बोटीत AK 47 सारख्या रायफल्स आढळल्यानं दहशत निर्माण होणं स्वाभाविक होतं. त्यातही ही बोट ओमान मार्गे आल्यानं शंका आणखी वाढली. कारण ओमानच्या समुद्र मार्गाचा वापर याआधीही दहशतवाद्यांनी केलाय
काही महिन्यांआधीच दिल्ली पोलिसांचं स्पेशल सेल आणि रॉ नं दोघांना अटक केली होती. ओसामा आणि जिशान नावाचे 2 दहशतवादी पाकिस्तानातून ट्रेनिंग घेऊन येत होते. त्याचवेळी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISIचं टेरर मॉड्यूल समोर आलं होतं. तसंच दहशतवाद्यांनी सांगितलं की ते ओमान मार्गेच पाकिस्तानात गेले होते. आणि आता हरिहरेश्वरमध्ये सापडलेली बोटही ओमान मार्गेच आलीय. त्यामुळं या बोटीचं ऑस्ट्रेलिया कनेक्शन असलं तरी, एक एक बाजू सुरक्षा यंत्रणांकडून तपासली जातेय.

Published on: Aug 19, 2022 12:32 AM