आणखी एक शेतकरी नेता लोकसभा लढवणार, युती की आघाडीतून?; काय दिले उत्तर?
धाराशिव राज्यातला मराठा समाज अडचणीत असून त्यांची अवस्था वाईट आहे त्यांना आरक्षण देणे गरजेचे असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी धाराशिव येथे व्यक्त केले आहे. दरम्यान राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या सहा जागा लढवण्याचा विचार करत असल्याचे मत देखील राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.
धाराशिव, १५ जानेवारी, २०२४ : धाराशिव राज्यातला मराठा समाज अडचणीत असून त्यांची अवस्था वाईट आहे त्यांना आरक्षण देणे गरजेचे असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी धाराशिव येथे व्यक्त केले आहे. मराठा समाज वर्षानुवर्ष शेती करतो आणि शेती आर्थिक अडचणीत आहे आणि शेती अडचणीत असल्याने मराठा समाज अडचणीत आला आहे. आरक्षणाचा प्रश्न सरकारने निर्माण केलाय तो सरकारने सोडवला पाहिजे. स्वाभिमानी शेतकरी संघटना ही मराठा आरक्षणाच्या बाजूने असल्याचे मत व्यक्त करत मराठा आरक्षणाला राजू शेट्टी यांनी पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या सहा जागा लढवण्याचा विचार करत असल्याचे मत देखील राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

