AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDIA Won T20 World Cup : वर्ल्डकप जिंकलो रे.... जय हो... T20 वर्ल्डकपवर दुसऱ्यांदा कोरलं भारतानं नाव

INDIA Won T20 World Cup : वर्ल्डकप जिंकलो रे…. जय हो… T20 वर्ल्डकपवर दुसऱ्यांदा कोरलं भारतानं नाव

| Updated on: Jun 30, 2024 | 10:18 AM
Share

दक्षिण अफ्रिकेचा धुव्वा उडवत टीम इंडिया चॅम्पियन ठरली असून T20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा दक्षिण अफ्रिकेवर सात धावांनी विजय झाला आहे. तब्बल १७ वर्षांनंतर टीम इंडियाने T20 वर्ल्डकप जिंकलेला आहे. वनडे वर्ल्डकप जेतेपदाचं स्वप्न भंगल्यानंतर टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक

समस्त भारतीयांसाठी अभिमानास्पद बातमी…T-20 वर्ल्डकपवर भारताने दुसऱ्यांदा आपलं नाव कोरलं आहे. भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम चॅम्पियन ठरली आहे. दक्षिण अफ्रिकेचा धुव्वा उडवत टीम इंडिया चॅम्पियन ठरली असून T20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा दक्षिण अफ्रिकेवर सात धावांनी विजय झाला आहे. तब्बल १७ वर्षांनंतर टीम इंडियाने T20 वर्ल्डकप जिंकलेला आहे. वनडे वर्ल्डकप जेतेपदाचं स्वप्न भंगल्यानंतर टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केलं. रोहित शर्माच्या खांद्यावर टी20 वर्ल्डकप स्पर्धेची धुरा सोपवली. हा विश्वास रोहित शर्माने खरा ठरवून दाखवला. त्यामुळे रोमांचक सामना काल क्रिकेटप्रेमींना अनुभवता आला. इतकंच नाहीतर देशभरात इंडियाच्या विजयाचा एकच जल्लोष आणि उत्सहाचं वातावरण पाहायला मिळाला. बघा कसं आहे स्कोअर कार्ड…

Published on: Jun 30, 2024 10:18 AM