Tahawwur Rana : 26/11 हल्ल्याबाबत तहव्वूर राणाची सर्वात मोठी कबुली
Tahawwur Rana News : तहव्वूर राणाने एनआयए समोर मुंबईत झालेल्या 26/11 हल्ल्याबाबत आत्तापर्यंतची सर्वात मोठी कबुली दिली आहे.
कृष्णा सोनारवाडकर, प्रतिनिधी
मी पाकिस्तानचा एजंट होतो. 26/11च्या हल्ल्यात देखील सहभागी होतो, अशी मोठी कबुली तहव्वूर राणाने एनआयए पुढे ही मोठी कबुली दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 10 एप्रिल रोजी राणाचं भारतात प्रत्यार्पन करण्यात आलं होतं. तो सध्या एनआयएच्या कोठडीत आहे. 26/11चा हल्ला पाकिस्तानच्या सहकार्याने केल्याची कबुलीच आता त्याने दिली असल्याचं समजत आहे. त्यामुळे मुंबई पोलीस देखील त्याच्यावर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
यावेळी राणाने अनेक मोठे खुलासे केले आहेत. मी पाकिस्तानी सैन्यात एजंट होतो. 26/11च्या हल्ल्यात माझा सहभाग होता. ही योजना आखण्यात माझा सहभाग होता. मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससारख्या ठिकाणांची पाहणी त्याने केली होती अशीही माहिती तहव्वूर राणाने एनआयएला सांगितली आहे, असं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

