Video | महिला तहसीलदार यांची ऑडिओ सुसाईड नोट व्हायरल
यापूर्वी वनाधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचा संदर्भ देत देवरे यांनी ऑडिओ क्लिप जारी केलीय. या क्लिपमध्ये महिला अधिकारी म्हणून काम करताना नोकरीत होणारा त्रास आणि वरिष्ठांचे दुर्लक्ष याबाबत सविस्तर कथन केलंय.
अहमदनगर : अहमदनगरला पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप तयार करून आत्महत्येचा इशारा दिला आहे. या क्लिपमुळे पारनेरसह जिल्ह्यात खळबळ उडाली. यापूर्वी वनाधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचा संदर्भ देत देवरे यांनी ऑडिओ क्लिप जारी केलीय. या क्लिपमध्ये महिला अधिकारी म्हणून काम करताना नोकरीत होणारा त्रास आणि वरिष्ठांचे दुर्लक्ष याबाबत सविस्तर कथन केलंय.
विशेष म्हणजे या महिला तहसिलदारांनी लोकप्रतिनिधींकडून होणाऱ्या त्रासाविषयीदेखील या ऑडिओ क्लिपमध्ये माहिती दिलीय. या महिला तहसिलदारांची ऑडिओ सध्या चांगलीच व्हायरल झाल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे. या क्लिपमध्ये महिला अधिकारी म्हणून होणारा त्रास, वरिष्ठांकडून केले जाणारे दुर्लक्ष, नोकरीत येताना केलेला निर्धार आणि प्रत्यक्षात झालेली निराशा अशा अनेक गोष्टींवर सविस्तर कथन केलंय.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

