Air India Plane Tragedy : एअर इंडियाच्या चेअरमननं मागितली माफी; म्हणाले, मी निशब्द.. या दुर्घटनेनंतर…
एअर इंडिया विमान अपघाताबद्दल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत टाटा सन्स आणि एअर इंडियाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी या भीषण अपघाताबद्दल माफी मागितली आहे.
टाटा सन्स आणि एअर इंडियाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी अहमदाबादमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या भीषण विमान अपघाताबद्दल माफी मागितली आहे. १२ जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान तांत्रिक बिघाडामुळे अवघ्या काही क्षणात कोसळले. या अपघातात विमानातील २४१ प्रवाशांसह एकूण २६८ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी २ पायलट आणि १० क्रू मेंबर्स होते. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही दुर्देवी मृत्यू झाला. या अपघातनंतर एअर इंडियावर देशभरातून संताप व्यक्त केला जात असताना एन चंद्रशेखरन यांनी माफी मागितली असून झालेल्या अपघाताबद्दल पश्चाताप व्यक्त केलाय.
विमान अपघाताबाबत चंद्रशेखरन म्हणाले, हा खूप कठीण काळ आहे. मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. टाटा कंपनीच्या विमान कंपनीत हा विमान अपघात घडल्याबद्दल मला खूप वाईट वाटतेय. या वेळी आपण फक्त मृतांच्या कुटुंबांसोबत राहू शकतो आणि त्यांच्याबद्दल शोक व्यक्त करू शकतो. असे म्हणत असताना त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना पाठिंबा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
Published on: Jun 19, 2025 11:57 AM
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
