World Cup 2023 Final : ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाजांची शरणागती, भारताकडून ‘इतक्या’ धावांचं आव्हान
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही तगड्या संघात आज महामुकाबला पाहायला मिळतोय. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये विश्वचषक २०२३ चा अंतिम थरारक सामना रंगतोय. वर्ल्डकप फायनल सामन्यात भारतीय संघाकडून ऑस्ट्रेलिया संघासमोर २४१ धावांचं आव्हान ठेवण्यात आलंय
मुंबई, १९ नोव्हेंबर २०२३ : भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही तगड्या संघात आज महामुकाबला पाहायला मिळतोय. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये विश्वचषक २०२३ चा अंतिम थरारक सामना रंगतोय. अशातच प्रथम फलंदाजी करत २४० धावा भारतीय संघाने केल्यात तर वर्ल्डकप फायनल सामन्यात भारतीय संघाकडून ऑस्ट्रेलिया संघासमोर २४१ धावांचं आव्हान ठेवण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्कारली आहे. तर फायनलमध्ये राहुल शर्मा आणि विराट कोहलीने अर्धशतकी खेळी पाहायला मिळाली तदर गील, अय्यर आणि जडेजा आणि सूर्यकुमार हे स्वस्तार बाद झाल्याने भारतीयांच्या मनात धाकधूक होत असल्याचे पाहायला मिळाले. विराट कोहली या अंतिम सामन्यात अर्धशतक करत ५४ वर बाद झाला तर रोहित शर्मा हा ४७ वर बाद झाल्याचे पाहायला मिळाले.
Latest Videos
Latest News