मुलाला मुख्यमंत्री करायचं होतं म्हणून… अमित शाहांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर भाजप नेत्यानं सांगितलं सत्य?
'अमित शाह बोलले हे सत्य आहे. २०१३ साली भाजप आणि शिवसेनेच्या युतीच्या चर्चा वरिष्ठ स्तरावर सुरू होत्या, त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर त्यांच्या मनात काय सुरू होतं हे अमित शाह यांच्या लक्षात आलं होतं...', अमित शाह यांच्या 'त्या' वक्तव्यावर भाजप नेत्यानं सांगितलं सत्य
मुंबई, २९ फेब्रुवारी २०२४ : उद्धव ठाकरे यांचे सुपूत्र आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करायचे होते, म्हणून त्यांनी युती तोडली, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केलंय. अमित शाह यांनी केलेल्या या वक्तव्यावर भाजप नेते आशिष शेलार यांना सवाल विचारला असता ते म्हणाले, ‘अमित शाह बोलले हे सत्य आहे. २०१३ साली भाजप आणि शिवसेनेच्या युतीच्या चर्चा वरिष्ठ स्तरावर सुरू होत्या, त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर त्यांच्या मनात काय सुरू होतं हे अमित शाह यांच्या लक्षात आलं होतं. याचा पुरावा म्हणजे आमच्या युतीच्या चर्चा, जागा वाटपाची चर्चा सुरू असताना आदित्य ठाकरे यांनी स्वतः वेगळं कॅम्पेन सुरू केलं होतं. २८८ पैकी १५१ प्लस शिवसेना…ही घोषणा केली. युती होती तर वेगळी घोषणा का? आदित्य ठाकरे यांचा राजकीय हव्यास आणि उद्धव ठाकरे यांची मुलाप्रती असलेली हतबलता…हेच २०१४ साली भाजप आणि शिवसेना युती तुटण्याचं कारण होतं हे स्पष्ट झालंय’, असे आशिष शेलार यांनी म्हणत सत्य परिस्थिती सांगितली.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब

