MNS News : ‘मुंबईत फक्त ठाकरे ब्रॅंड..’, गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
Banners In Girgaon : मनसे कार्यकर्त्यांकडून गिरगावात जोरदार बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याचा हा बॅनर आहे.
मनसे कार्यकर्त्यांकडून गिरगावात जोरदार बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याचा हा बॅनर आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघं भाऊ एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात चांगळ्याचं रंगत आहेत. त्यामुळे आता मनसे कार्यकर्त्यांकडून देखील याबद्दल बॅनरबाजी करण्यात येत आहे. मुंबईत ठाण्यानंतर आता गिरगावमध्ये देखील ठाकरे बंधूंचे बॅनर लागलेले बघायला मिळाले आहेत. ‘मराठी माणसाची आण बाण शान, मुंबईत फक्त ठाकरे ब्रॅंड’ अशा आशयाचे हे बॅनर सध्या गिरगावात झळकलेले बघायला मिळत आहेत. या बॅनरवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा बाळासाहेब ठाकरेंच्या सोबतचा फोटो लावण्यात आलेला आहे.
Published on: Apr 20, 2025 03:59 PM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

