Thackeray Brothers : राज ठाकरे पुन्हा मातोश्रीवर, ठाकरे बंधूंमधील जवळीक वाढली! भेटीचं कारण काय? चर्चांना उधाण
राज ठाकरे नुकतेच उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी दाखल झाले. संजय राऊत यांच्या नातवाच्या नामकरण सोहळ्यानंतर ही भेट झाली. ठाकरे बंधूंमधील वाढती जवळीक पाहता आगामी मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये संभाव्य राजकीय युतीबाबत चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी पोहोचले आहेत. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात भेट झाली. संजय राऊत यांच्या नातवाच्या नामकरण सोहळ्यानंतर ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित उपस्थित होते.
विशेष म्हणजे, राज ठाकरे यांची मातोश्रीला ही दुसरी भेट आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तही राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन शुभेच्छा दिल्या होत्या. 2006 साली शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून ठाकरे कुटुंबात दुरावा निर्माण झाला होता, मात्र गेल्या काही काळापासून दोघं बंधूंमधील जवळीक वाढताना दिसत आहे. आगामी मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही वाढती जवळीक राजकीय युतीत रूपांतरित होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

