Thackeray Brothers : हिंदी सक्ती विरोधातला मोर्चा दोन्ही ठाकरेंना एकत्र आणणार? राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंना निमंत्रण!
हिंदी सक्तीवरून राज ठाकरे यांनी मोर्चाची घोषणा केली. पाच जुलैला मनसेचा मुंबईत मोर्चा निघणार आहे आणि त्यासाठी मनसेकडून उद्धव ठाकरे यांना प्रस्ताव गेलाय. मोर्चात सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे मोर्चाच्या माध्यमातून ठाकरे बंधूंची एकत्र येण्याची सुरुवात होणार आहे का?
हिंदी सक्ती विरोधातील मनसेच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरेंशीही बोलणार असं राज ठाकरे म्हणाले आणि पुढच्या काही तासात राज ठाकरेंकडून तसा फोनही गेला. मनसेकडून ठाकरेंच्या शिवसेनेला मोर्चात सहभागी होण्यासाठी प्रस्ताव देण्यात आलाय. उद्धव ठाकरेंना ५ जुलैच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी निमंत्रण देण्यात आले. राज ठाकरेंनी संजय राऊतांना फोन करून मोर्चात सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिलं. तसंच एकच मोर्चा हवा, दोन मोर्चे नको असा मनसेचा आग्रह असल्याचं कळतंय. कारण ७ जुलैच्या मराठी अभ्यास केंद्राच्या मोर्चाला उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिलेला आहे. कोणत्याही राजकीय अजेंड्याशिवाय मोर्चा निघावा अशी मनसेची भूमिका आहे.
त्यामुळे मनसेच्या मोर्चात ठाकरे बंधू एकत्र येणार का? याकडे नजरा लागल्या. राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत कोणत्याही वाद आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा या वाक्याचाही दाखला दिला. या वाक्याचा अर्थ मोर्चाच्या दिवशी कळेल, असं सुचकपणे राज ठाकरे म्हणाले. म्हणजे जर राज ठाकरेंच्या मोर्चात उद्धव ठाकरे आले तर मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंच्या युतीचा मार्ग मोकळा होईल.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..

