Vijay Pagare | आर्यन खान प्रकरणावरुन मोठे दावे करणाऱ्या विजय पगारेंना जीवे मारण्याची धमकी

आर्यन खान प्रकरणाचा कथित मास्टरमाईंड सुनील पाटील यांनी विजय पगारे यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती, असा त्यांचा आरोप आहे. सुनील पाटील यांच्याकडून मला आणि माझ्या परिवाराला धोका आहे. वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याने कुटुंबाला आणि स्वतः मला सरकारने सुरक्षा पुरवावी, अशी मागणी विजय पगारे यांनी केली आहे.

बहुचर्चित आर्यन खानच्या ड्रग्ज कारवाई प्रकरणी माध्यमांसमोर आल्यानंतर प्रत्यक्षदर्शी विजय पगारे यांनी सरकारने सुरक्षा पुरवावी, अशी मागणी केलीय. त्यांना वारंवार जीवे मारण्याची धमकी येत असल्याने सरकारने सुरक्षा पुरवावी, अशी मागणी विजय पगारे यांनी केली. मुंबई ड्रग्स केस आणि आर्यन खान प्रकरणात रोज नवीन आणि खळबळजनक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील साक्षीदार असलेल्या विजय पगारे यांनी मोठे मोठे गौप्यस्फोट केले आहेत. यानंतर त्यांना आता धमक्या येऊ लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारकडे सुरक्षआ पुरविण्याची मागणी केली आहे.

आर्यन खान प्रकरणाचा कथित मास्टरमाईंड सुनील पाटील यांनी विजय पगारे यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती, असा त्यांचा आरोप आहे. सुनील पाटील यांच्याकडून मला आणि माझ्या परिवाराला धोका आहे. वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याने कुटुंबाला आणि स्वतः मला सरकारने सुरक्षा पुरवावी, अशी मागणी विजय पगारे यांनी केली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI