इलेक्शन संपलं, वैर संपलं... महायुती आणि महाविकास आघाडीतील दोन नेत्यांची गळाभेट...  पुढे काय झालं बघा व्हिडीओ

इलेक्शन संपलं, वैर संपलं… महायुती आणि महाविकास आघाडीतील दोन नेत्यांची गळाभेट… पुढे काय झालं बघा व्हिडीओ

| Updated on: Dec 06, 2024 | 2:58 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि भाजपचे नेते प्रसाद लाड हे दोन्ही नेते मुंबईतील दादार परिसरात असणाऱ्या चैत्यभूमीवर आले होते. यावेळी चैत्यभूमीवर अचानक दोन्ही नेते आमने-सामने आलेत.

शिवसेना उबाठा अर्थात ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि भाजपचे नेते प्रसाद लाड यांची गळाभेट झाल्याचे आज पाहायला मिळाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि भाजपचे नेते प्रसाद लाड हे दोन्ही नेते मुंबईतील दादार परिसरात असणाऱ्या चैत्यभूमीवर आले होते. यावेळी चैत्यभूमीवर अचानक दोन्ही नेते आमने-सामने आलेत. त्यांनी एकमेकांना हातात हात देत शेकहँड केला. यानंतर त्यांनी गळाभेट घेतली. दरम्यान, यावेळी त्यांच्यात काहीशी हसी मजाक झाल्याचेही पाहायला मिळाले. इतकंच नाहीतर त्या दोघांनी एकमेकांची विचारपूसही केल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही नेते वेगवेगळ्या पक्षात असल्याने आणि त्या दोघांनी अचानक गळाभेट घेतल्याने सगळेच पाहत राहिले. काहिंनी तर या दोघांच्या गळाभेटीचा क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज ६८ वी पुण्यतिथी साजरी केली जात आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर भीमसागर उसळला आहे.

Published on: Dec 06, 2024 02:58 PM