किरीट सोमय्या दलाल, अनिल परब आक्रमक; काय केली सडकून टीका?
VIDEO | किरीट सोमय्या यांच्या सांगण्यावरून ईडी चालतेय का? अनिल परब यांचा सवाल, बघा काय म्हणाले?
मुंबई : साई रिसॉर्ट प्रकरणी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. दरम्यान या प्रकरणात ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या नावाला देखील जोडलं जात आहे. अशातच अनिल परब यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मला असं वाटतं की भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या नावावर ईडी चालते का? असा मला प्रश्न आहे. सदानंद कदम यांची प्रकृती ठिक नसल्याने त्यांचे ऑपरेशन झाले. ऑपरेशन नंतर मला दहा दिवसाची विश्रांतीची गरज आहे आणि त्यानंतर येतो असं त्यांनी ईडीला सांगितलं. मात्र आता त्यांना अटक झाली की नाही हे माहित नसल्याचे अनिल परब यांनी सांगितले. परंतु किरीट सोमय्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. याचा अर्थ असा आहे की, किरीट सोमय्यांच्या सांगण्यावरूनच ईडीचे कामकाज चालते. ईडीच्या अधिकाऱ्यांना पूर्णपणे सहकार्य करायचं, आम्ही तसं सहकार्य केलं असल्याचेही अनिल परब यांनी म्हटले आहे.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

