देवेंद्र फडणवीस चांगले गृहमंत्री, मात्र…; चंद्रकांत खैरे नेमकं काय म्हणाले?
VIDEO | एकमेकांची नावे बदनाम करण्यासाठी षड्यंत्र सुरू, चंद्रकांत खैरे यांचा हल्लाबोल
औरंगाबाद : सोशल मीडियावर औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात कोल्हापुरात आज हिंदू संघटनांचा मोर्चा काढला. यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. यावेळी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज केला आणि परिस्थितीत चिघळली. यावर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, अहमदनगर किंवा सोशल मिडीयावर औरंगजेबाचे फोटो का झळकावले, यामुळे हिंदुत्ववादी लोकांचे मन दुखले. हे सरकारचे अपयश आहे, गृहमंत्री या समस्यांकडे लक्ष देत नाही, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. तर या सगळ्याप्रकरणांवर देवेंद्र फडणवीस यांचं नियंत्रण असायला हवे पण ते नाहीये. देवेंद्र फडणवीस चांगले गृहमंत्री, मात्र त्यांचं लक्ष त्यांच्या लोकांना वाचवण्यात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुढे ते असेही म्हणाले, राज्यात काहीच विकास होत नाही विकासावरून लक्ष वळविण्यासाठी हे प्रकार सुरू आहेत. महाविकास आघाडीला दलित मुस्लिमांची मते मिळू नयेत म्हणून हे प्रकार सुरू आहेत. सरकारमध्ये दोघांमध्ये एकमेकांची नावे बदनाम करण्यासाठी षड्यंत्र सुरू आहे अशी शंका येते तणाव निर्माण करण्याचे कट कारस्थान हे त्यांचेच आहे, असेही ते म्हणाले.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
मुंबईत महापौर कोणाचा? युतीची घोषणा करताच राज ठाकरे यांनी थेट म्हटलं...

