कोश्यारी यांच्यासारखे राज्यपाल महाराष्ट्राला पुन्हा…, काय म्हणाले राज्यपालांच्या राजीनाम्यावर संजय पवार?
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांची प्रतिक्रिया, बघा व्हिडीओ
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात अवमानकारक उद्गार काढल्यानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. यावर ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनी भाष्य केले आहे. या निर्णयाला थोडासा उशीर झाला असला तरी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनामाचे स्वागतच आहे. या निर्णयाला उशिर झाल्याने पुरोगामी महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. पुन्हा असे राज्यपाल महाराष्ट्राला बघायला मिळू नयेत अशी अंबाबाई चरणी आम्ही प्रार्थना करू, अशी प्रतिक्रिया संजय पवार यांनी दिली आहे. राज्यापाल म्हटल की, कायदे, त्यांचे अधिकार याचे योग्यरितीने पालन करणे हे त्यांचे काम असते. कुणाच्या तरी इशाऱ्यावर काम करणे हे राज्यपालांचे काम नसते. विशिष्ट पक्षाचे काम करणारे राज्यपाल महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाहिले असल्याचा टोलाही संजय पवार यांनी लगावला आहे.
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार

