‘जादू की झप्पी तसं जादूका किस’; राहुल गांधी यांच्या फ्लाइंग किसवर राऊत यांची प्रतिक्रिया, भाजपवर टीकास्त्र
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात फ्लाईंग किस दिल्याचा आरोप भाजप नेत्या आणि मंत्री स्मृती ईराणी केला आहे. तर त्यांच्यासह भाजपच्या महिल्या खासदारांनी अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2023 | काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या एका कृतीची सध्या जोरदार चर्चा होत आहे. तर त्यांच्या कृतीवरून भाजप आक्रमक झाली असून राज्यात आज भाजप महिला आघाडीचे आंदोलन करण्यात येणार आहे. काल अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात फ्लाईंग किस दिल्याचा आरोप भाजप नेत्या आणि मंत्री स्मृती ईराणी केला आहे. तर त्यांच्यासह भाजपच्या महिल्या खासदारांनी अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. तर राऊत यांनी राहुल गांधींच्या या कृतीचं समर्थन केलं आहे. त्यांनी, भाजप कधी कोणत्या गोष्टीचं प्रदर्शन करेल, हे सांगता येत नाही, आता जे यावरून तक्रार करत आहेत. ते जंतरमंतरवर गेले होते का? जंतरमंतरवर महिला कुस्तीपटू आंदोलनाला बसल्या होत्या तेव्हा कुणी तिथे गेलं होतं का असा सवाल केलाय. तर राहुल गांधींनी द्वेष, सूड यावर उतारा म्हणून संपूर्ण देशाला प्रेमाचा किस दिला. जशी जादू की झप्पी तसं जादू का फ्लाइंग किस त्यांनी दिलाय. तर ज्यांना प्रेमाची सवय नाही. ज्यांच्यात ममत्व उरलं नाही. त्यांना फ्लाइंग किस म्हणजे काय हे समजणार नाही असा टोला लगावला आहे.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

