ठाकरे की शिंदे… धक्का नेमका कुणाला? हेमंत गोडसे पुन्हा ठाकरे गटात येणार? ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
एकनाथ शिंदे यांची शिवसेना अर्थात शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे हे पुन्हा ठाकरे गटात येणार असून ते ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी केलाय. तर हेमंत गोडसे अनेक दिवसांपासून मिलिंद नार्वेकर यांना भेटत असल्याचेही त्यांनी म्हटले
मुंबई, २८ फेब्रुवारी २०२४ : एकनाथ शिंदे यांची शिवसेना अर्थात शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे हे पुन्हा ठाकरे गटात येणार असून ते ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी केलाय. तर हेमंत गोडसे अनेक दिवसांपासून मिलिंद नार्वेकर यांना भेटत असल्याचेही ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी म्हटले आहे. दरम्यान, मिलिंद नार्वेकर हे हेमंत गोडसे यांच्या संपर्कात की हेमंत गोडसे हे मिलिंद नार्वेकर यांच्या संपर्कात…कोण कोणाच्या संपर्कात हे लवकरच कळेल असं वक्तव्य करत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उत्तर दिलंय. यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे कुणी जायचा प्रश्नच येत नाही… शिवाय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिंदे गटात किती लोकं येताय हे येणाऱ्या काही दिवसात दिसेल, असे म्हणत संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाला खोचक टोला लगावल सूचक संकेतही दिले आहे.
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले

