गौतमी पाटील हिला भाजप निवडणुकीचं तिकीट देणार? सुषमा अंधारे यांनी केंद्रीय मंत्र्यांवरच डागली तोफ
लोकसभेपूर्वी शहापूरमध्ये विविध पक्षातील बड्या नेत्याचे भेटीगाठी ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांच्याकडून होत आहे. यावेळी ठाकरे गटाच्या मुक्त संवाद दौऱ्याप्रसंगी भाजप खासदार केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यावर सुषमा अंधारे यांनी भिंवडीत जाऊन जोरदार हल्लाबोल केला.
ठाणे, २८ फेब्रुवारी २०२४ : आगामी लोकसभेपूर्वी शहापूरमध्ये ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांचा मुक्त संवाद दौरा सुरु आहे. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यावर तोफ डागली. दरम्यान, लोकसभेपूर्वी शहापूरमध्ये विविध पक्षातील बड्या नेत्याचे भेटीगाठी ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांच्याकडून होत आहे. यावेळी ठाकरे गटाच्या मुक्त संवाद दौऱ्याप्रसंगी भाजप खासदार केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यावर सुषमा अंधारे यांनी भिंवडीत जाऊन जोरदार हल्लाबोल केला. संवाद दौऱ्यावर असलेल्या सुषमा अंधारे म्हणाल्या, कपिल पाटील यांना पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही. कपिल पाटील यांची शहापुरात सभा असल्याने गर्दी जमणार नाही म्हणून ते गौतमी पाटील यांना खास गर्दी जमवण्यासाठी घेऊन येत आहेत. जर गौतमी पाटीलमुळे लोक जमत असतील तर त्यांनी निवडणुकीचं तिकीट गौतमी पाटील हिलाच द्यावं, असा खोचक टोलाही सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.
Published on: Feb 28, 2024 11:54 AM
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
अंगावर भागलपुरी शाल, कानांवर रुमाल अन्... एका मतासाठी BMC तील नगरसेवक
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण?
