… तोपर्यंत दार उघडणार नाही, शेतकरी प्रश्नांसाठी नितीन देशमुख घेतला आक्रमक पवित्रा
बाळापूर नगर परिषद येथे ठाकरे गट आमदार नितीन देशमुख यांनी तातडीची बैठक बोलावली. मात्र या तडकाफडकी बोलवल्या बैठकीत पीक विमा कंपनीचे अधिकारी पोहोचलेच नाही आणि त्यांना आमदारांनी फोन लावले तरी देखील त्यांनी कोणताही संपर्क केला नाही. पीक विम्याचे अधिकारी...
पीक विम्या संदर्भात अकोल्यातील बाळापूर नगर परिषद येथे ठाकरे गट आमदार नितीन देशमुख यांनी तातडीची बैठक बोलावली. मात्र या तडकाफडकी बोलवल्या बैठकीत पीक विमा कंपनीचे अधिकारी पोहोचलेच नाही आणि त्यांना आमदारांनी फोन लावले तरी देखील त्यांनी कोणताही संपर्क केला नाही. दरम्यान, विमा कंपनीचे अधिकारी, प्रतिनिधी न आल्याने शेवटी आमदारांनी जो पर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत नगर परिषद हॉलचे दरवाजे लावून तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांना बाहेर सोडणार नाही असा पवित्रा नितीन देशमुख यांनी घेल्याचे पाहायला मिळाले. आज तालुक्यामध्ये झालेल्या नुकसान भरपाई संदर्भात पीक विम्याची बैठक बोलावली होती. या बैठकीला पीक विम्याचे अधिकारी उपस्थित न राहिल्याने संतप्त झालेले आमदार आणि शेतकऱ्यांनी आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले.
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी

