संजय राऊत यांनी विधानसभेच्या निकालावरून काँग्रेस-भाजपच्या विजयाचं काय केलं भाकित?
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पाचही राज्यांच्या निकालावरून काँग्रेस-भाजपच्या विजयाचे भाकित वर्तविले आहे. अजूनही निकाल स्पष्ट नाहीये. हा सुरुवातीचा कल आहे. पाच राजाच्या निवडणुका आहेत. यामध्ये मी तुम्हाला खात्रीने सांगतो...
मुंबई, ३ डिसेंबर २०२३ : भाजपने काँग्रेसमुक्त भारत करण्याचा नारा दिला होता, परंतु काँग्रेस पक्ष भाजपला विधानसभा निवडणुकीत जोरदार टक्कर देताना दिसतोय. तेलगंणा सारख्या राज्यात मोदी-शहा आपली जादू दाखवू शकले नाहीत, तिथे राहुल गांधी यांनी पिछाडीवर टाकले आहे. राजस्थान आणि मध्यप्रदेश येथेही हीच परिस्थिती असेल, असे भाष्य करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पाचही राज्यांच्या निकालावरून काँग्रेस-भाजपच्या विजयाचे भाकित वर्तविले आहे. अजूनही निकाल स्पष्ट नाहीये. हा सुरुवातीचा कल आहे. पाच राजाच्या निवडणुका आहेत. यामध्ये मी तुम्हाला खात्रीने सांगतो, तेलंगणामध्ये काँग्रेस पक्षाचा विजय होईल. छत्तीसगडमध्ये देखील काँग्रेसचं राज्य कायम राहील. मिझोराममध्ये तिकडचे प्रादेशिक पक्ष सत्तेवर येईल. हे तीन निकाल सोडले तर राजस्थान आणि मध्य प्रदेशात खूप मोठी टक्कर होईल, असं संजय राऊत म्हणाले. तर आता कल, ट्रेन्स समोर येत आहे. हे ट्रेन्स अनेकदा कायम राहतात किंवा राहत नाहीत. आम्ही बिहारला हे पाहिलं आहे. मध्यप्रदेश आणि राजस्थान या दोनपैकी एका राज्यात भाजपचा पराभव होईल, याची आम्हाला खात्री आहे, असं संजय राऊतांनी ठामपणे म्हटले आहे.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
