त्र्यंबकेश्वरमधील घटनेवर संजय राऊत यांचं भाष्य; म्हणाले, ‘मोदींपासून आम्ही सगळे अजमेरच्या दर्ग्यावर जातो अन्…’
VIDEO | नकली हिंदुत्वाच्या नावाने बोंबा मारायच्या आणि...., संजय राऊत यांनी नाव न घेता कुणाला फटकारले?
नाशिक : महाविकास आघाडीत असलेल्या संजय राऊत यांचा हिंदुत्वाशी संबंध काय? असा प्रश्न नकली हिंदुत्ववाले उपस्थित करत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. ते नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात झालेल्या प्रकरणासंदर्भात माध्यमांशी बोलत होते. त्र्यंबकेश्वर आमच्या श्रद्धेच्या आणि अस्थेचा विषय असल्याचे म्हणत राऊत म्हणाले, कोणीही त्र्यंबक मंदिरात घुसल्याची माहिती नाही. मंदिर प्रशासनावर दबाव आणून पत्र द्यायला लावलं. त्यांनीच आज त्र्यंबकेश्वरला बंद करायला सांगितलं आहे. ऊरूस उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संदलची परंपरा 100 वर्षांची आहे. मंदिराच्या दारावर देवाला धूप दाखवून पुढे जातात. देशात या परंपरा सर्वत्र आहेत. नरेंद्र मोदींपासून आम्ही सगळे अजमेर शरीफला जातो. माहीम आणि हाजी अलीच्या दर्ग्यात जातो. त्यात काही हिंदूसह संघाचे लोकही आहेत. मला माहीत आहे. पोलीसही चादर चढवतात. पण त्र्यंबकेश्वरच्या नावाने महाराष्ट्रातील वातावरण उद्ध्वस्त करायचं. नकली हिंदुत्वाच्या नावाने बोंबा मारायच्या हे प्रकार सुरू आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली. यासह ते असेही म्हणाले की, एसआयटी कसल्या नेमता? तुम्हाला माहीत नाही महाराष्ट्रात काय चाललं ते? राम नवमी संदर्भात एसआयटी नेमली का? राम नवमीला कधी नव्हे त्या दंगली झाल्या. गेल्या 60 वर्षात महाराष्ट्रात दंगल झाली नव्हती. त्यावर एसआयटी नेमली का नाही नेमली? असा सवालही राऊतांनी सरकारला केला.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?

