भाजपचे जे. पी नड्डा जिथे जातात तिथे त्यांचा पराभव होतो, कुणी केली खोचक टीका?
VIDEO | कायद्याचं राज्य मोडीत काढण्यासाठी संविधानाचा वापर, ठाकरे गटाच्या नेत्याचा राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल
नाशिक : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे दोन दिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली खोचक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, जेपी नड्डा महाराष्ट्रात येत असतील तर येऊ द्या. आनंद आहे. ते जिथे जिथे जातात तिथे त्यांचा पराभव होतो. ते कर्नाटकात ठाण मांडून बसले. कर्नाटकात भाजपचा पराभव झाला. आता ते महाराष्ट्रात येत आहेत. आम्ही त्यांचं स्वागत करतो, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला. तर संजय राऊत यांनी पुन्हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. राऊत म्हणाले, राहुल नार्वेकरांच्या पक्षांतराविषयी आणि वैचारिक बैठकीविषयी सांगितलंच आहे. पक्षांतर हा त्यांचा छंद आणि व्यवसाय आहे, हे स्पष्टपणे सांगतो. ते ज्या पक्षात गेले नाहीत असा एकही पक्ष उरला नाही. त्यामुळे त्यांना पक्षांतराविषयी चीड असण्याचं कारण दिसत नाही. त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी ज्या पद्धतीने मुलाखती दिल्या आहेत. त्या भगतसिंह कोश्यारी यांना शोभत होत्या. घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने नियमबाह्य वर्तन करू नये हे संकेत आहेत, असं संजय राऊत यांनी सुनावलं.
तर कायद्याचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी संविधान निर्माण झालंय. तुम्ही कायद्याचं राज्य मोडीत काढण्यासाठी संविधानाचा वापर करत आहात. तुम्ही ज्या मुलाखती देत आहात त्या कायद्याच्या राज्यात बसत नाहीत. न्यायालयासमोर जो खटला चालवला जातो, तेव्हा न्यायामूर्ती पत्रकार परिषदा घेत नाही. मी काय करणार हे सांगत नाही. मला काय अधिकार आहे हे सांगत नाहीत. मी हा पहिला माणूस पाहिला. पहिले कोश्यारी आणि दुसरे हे, असे म्हणत संजय राऊत यांनी राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल केला.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?

