‘मी उद्धव ठाकरे यांचा स्वभाव जाणतो, ते त्या आमदारांसाठी… एक सेंटीमीटर देखील’; राष्ट्रवादी नेत्याचं सुचक वक्तव्य
उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. ज्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, बेईमानी केली. त्या गद्दारांना शिवसेनेत प्रवेश दिला जाणार नाही, असं संजय राऊत म्हणाले. काही आमदार आमच्या संपर्कात आहेत.
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर खोचक टोला लगावला होता. तसेच त्यांनी शिंदे गटातील आमदारांना गर्भीत इशारा दिला होता. त्यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. ज्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, बेईमानी केली. त्या गद्दारांना शिवसेनेत प्रवेश दिला जाणार नाही, असं संजय राऊत म्हणाले. काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते मेसेज करतात, भेटतात. वेदना बोलून दाखवतात. पण तरीही त्यांना प्रवेश देणार नाही, असं राऊत यांनी निक्षून सांगितलं. त्याचदरम्यान आता याच प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी आव्हाड यांनी, गेल्या दोन वर्षात उद्धव ठाकरे यांचा स्वभाव कळाला आहे. त्यामुळे ते त्या आमदारांसाठी मातोश्रीचे दरवाजे उघडणार नाहीत. तर एक सेंटीमीटर देखील ओढणार नाहीत असं म्हटलं आहे.
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'

