Maharashtra Politics : भाजपचा ठाकरेंना दे धक्का… शिंदेंच्या उमेदवारांविरोधात लढणारे ठाकरेंचे 2 शिलेदार कमळ घेणार हाती
ठाकरे गटातील दोन महत्त्वाचे नेते, राजू शिंदे आणि अद्वय हिरे, यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील राजू शिंदे आणि मालेगावमधील अद्वय हिरे हे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेणार आहेत.
डोंबिवलीमध्ये भाजपकडून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का दिल्यानंतर भाजपनं मालेगावमध्येही उद्धव ठाकरे यांना धक्का दिला आहे. मालेगाव येथील अद्वय हिरे आणि छत्रपती संभाजीनगरमधील राजू शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांविरोधात निवडणूक लढणारे ठाकरेंचे दोन खंदे शिलेदार भाजपचं कमळ हाती घेणार आहेत. या दोन्ही नेत्यांनी यापूर्वी अनुक्रमे दादा भुसे आणि संजय शिरसाट यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज दुपारी तीन वाजता त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने भाजपसाठी हा महत्त्वाचा राजकीय लाभ मानला जात आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

