AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena ubt | गटार पूजन करत ठाकरे सेनेचा संताप; ठाणे पालिकेविरोधात अनोखं आंदोलन!

Shivsena ubt | गटार पूजन करत ठाकरे सेनेचा संताप; ठाणे पालिकेविरोधात अनोखं आंदोलन!

| Updated on: Jun 09, 2026 | 2:22 PM
Share

ठाणे जिल्ह्यातील दिवा परिसरात नालेसफाईच्या कामांवरून राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ठाणे महानगरपालिकेविरोधात अनोखे आंदोलन छेडले आहे. नालेसफाईची कामे अपूर्ण आणि निकृष्ट पद्धतीने केल्याचा आरोप करत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ‘गटार पूजन’ करून प्रशासनाचा निषेध नोंदवला.

ठाणे जिल्ह्यातील दिवा परिसरात नालेसफाईच्या कामांवरून राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ठाणे महानगरपालिकेविरोधात अनोखे आंदोलन छेडले आहे. नालेसफाईची कामे अपूर्ण आणि निकृष्ट पद्धतीने केल्याचा आरोप करत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ‘गटार पूजन’ करून प्रशासनाचा निषेध नोंदवला.

दिवा परिसरात पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी नालेसफाईची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. अनेक ठिकाणी गटारे आणि नाले साफ न केल्याने पावसाळ्यात नागरिकांना पूरस्थिती आणि पाणी साचण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते, असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन प्रतीकात्मक स्वरूपात गटार पूजन केले. या माध्यमातून त्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत नालेसफाईची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित प्रश्नांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. दरम्यान, या अनोख्या आंदोलनामुळे दिवा परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले असून, नालेसफाईच्या कामांबाबत ठाणे महानगरपालिका काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

Published on: Jun 09, 2026 02:20 PM

Follow Us
भाजपने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची खरंच अट घातली? CM फडणवीसांचे नाव घेत बड्या नेत्याचे मोठे विधान.

भाजपने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची खरंच अट घातली? CM फडणवीसांचे नाव घेत बड्या नेत्याचे मोठे विधान

Chanakya Niti: चाणक्य म्हणतात या लोकांच्या चुकीला नका देऊ माफी….

Chanakya Niti: चाणक्य म्हणतात या लोकांच्या चुकीला नका देऊ माफी…

weather update : पाऊस आलारे, अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट.

weather update : पाऊस आलारे, अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट

सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी आता शेखर सुमन उतरले, म्हणाले जिंदा लाशों में से एक जीवित.

सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी आता शेखर सुमन उतरले, म्हणाले जिंदा लाशों में से एक जीवित

तुकाराम मुंढे यांचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका, बनावट गुटखा प्रकरणात जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल.

तुकाराम मुंढे यांचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका, बनावट गुटखा प्रकरणात जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल

T20 World Cup 2028 स्पर्धेसाठी 12 संघ ठरले, 8 संघ पात्रता फेरीतून ठरणार.

T20 World Cup 2028 स्पर्धेसाठी 12 संघ ठरले, 8 संघ पात्रता फेरीतून ठरणार