प्रेम विवाहाचा थरारक शेवट! पतीनेच शिर धडावेगळं केलं अन्…
भिवंडीतील इदगा परिसरात सापडलेल्या एका महिलेच्या शरीरापासून वेगळ्या झालेल्या डोक्याची घटना पोलिसांनी उकलली आहे. 26 वर्षीय परवीन उर्फ मुस्कान या महिलेचा तिच्याच पती ताहा अंसारने खून केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी 24 तासांतच आरोपीला ताब्यात घेतले आहे.
भिवंडी शहरात 30 ऑगस्ट रोजी एक धक्कादायक घटना घडली. इदगा परिसरातील दलदलीत एक महिलाचे डोके धडापासून वेगळे झालेले आढळले. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि 24 तासांतच मृत महिलेची ओळख पटवली. मृत परवीन उर्फ मुस्कान ही 26 वर्षीय विवाहित महिला होती. तपासात तिच्या पती ताहा अंसारवर संशय आला आणि कसून चौकशी केल्यानंतर त्यानेच ही हत्या केल्याचे कबूल केले. पोलिस आता फॉरेन्सिक टीमच्या मदतीने पुरावे गोळा करत आहेत. पोलिसांच्या जलद कारवाईमुळे गुन्हा उकलला गेला.
Published on: Sep 04, 2025 01:36 PM
Latest Videos
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

