भाजपवर नाराजी, ठाण्यात स्वबळावर लढा? शिंदेसेनेच्या बैठीक काय घडलं?
ठाण्यात काल पार पडलेल्या शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकीत भाजपबद्दल नाराजीचा सूर उमटला. पदाधिकाऱ्यांनी आगामी ठाणे महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा आग्रह धरला. स्थानिक पातळीवर युती असली तरी भाजपसोबतच्या कुरबुरीमुळे एकला चलो रेचा नारा देण्यात आला, असे बैठकीत समोर आले.
ठाण्यातील टेंभी नाका परिसरात काल एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपबद्दल आपली नाराजी व्यक्त केली. भाजपसोबत अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने आगामी ठाणे महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा सूर या बैठकीत दिसून आला. एकला चलो रेचा नारा देत अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला.
जरी महायुतीचे सरकार असले तरी स्थानिक पातळीवर भाजप आणि शिंदे गटात गेल्या काही महिन्यांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी भाजप आमदार संजय केळकर यांनी ठाण्याचा महापौर भाजपचाच होईल, असे विधान केले होते. या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या गटातील ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. पक्षाला टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी कार्यकर्ते वर्षानुवर्षे काम करतात, त्यामुळे त्यांच्या भावना नेत्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. तथापि, कोणताही अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील आणि तो बंधनकारक असेल, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?

