Eknath Shinde | कळव्यात दरड कोसळून 5 जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबाला 5 लाखांची मदत : एकनाथ शिंदे

कळवा पूर्व येथील घोळाई नगरमधील डोंगर परिसरात एका घरावर दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापक विभागाने दिली आहे.

ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा पूर्व येथील घोळाई नगरमधील डोंगर परिसरात एका घरावर दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापक विभागाने दिली आहे. या दुर्घटनेत घराचे प्रचंड नुकसान झाले आहे. बचाव पथकाने आतापर्यंत दोन जणांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. ते जखमी अवस्थेत आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात रवाना करण्यात आलं आहे. दरम्यान, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली. त्यावेळी त्यांनी मृत्यांच्या नातेवाईंकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI