Thane Video : ठाण्यात मोठी दुर्घटना… किसननगरमधील इमारतीची गॅलरी डोळ्यांदेखत कोसळली अन्… घटनास्थळाची बघा दृश्य
दुर्घटना घडलेल्या इमारतीतील स्थानिकांचे तात्पुरत्या स्वरूपात पालिकेच्या शाळेत स्थलांतर करण्यात आले आहे. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अग्निशमन दल दाखल झाले असून मदत कार्य सुरू आहे.
ठाण्यात एक मोठी दुर्घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. ठाण्याच्या किसननगर भागातील एका इमारतीच्या गॅलरीचा काही भाग कोसळला आहे. ही घटना प्रत्यक्षदर्शींनी आपल्या डोळ्यांदेखत घडताना पाहिली. दरम्यान, या घटनेचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्याच्या किसन नगर ३ मध्ये एक चार मजली इमारत होती. जी इमारत धोकादायक असल्याचे जाहीर करण्यात आले होते. याच धोकादायक चार मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा काही भाग कोसळला. ही घटना आज घडली. या धोकादायक इमारतीमधील ७० रहिवाशांचे ही घटना घडल्यानंतर तात्पुरते पालिकेच्या शाळेत स्थलांतर करण्यात आले आहे. या इमारतीत एकूण २७ खोल्या असल्याचे सांगितले जात आहे. तर सुमारे ४० वर्ष जुनी इमारत असल्याचा दावा देखील प्रशासनाकडून करण्यात आला आहे. या घटनेत अद्याप कोणीही जखमी नसल्याची माहिती आहे.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी

