MNS Dahi Handi 2025 : मनसेच्या हंडीत 7 व्या थरावरून गोविंदा पडला अन्… अविनाश जाधवांच्या दहीहंडीत नेमकं घडलं काय?
मुंबईत दुपारी ३ वाजेपर्यंत एकूण ३० गोविंदा जखमी झालेत. त्यापैकी सध्या १५ गोविंदांवर उपचार सुरू आहे तर १५ गोविंदांना डिस्चार्ज देण्यात आलाय. जखमी गोविंदांची विविध सरकारी आणि बीएमसी रुग्णालयांकडून माहिती देण्यात आली आहे.
मराठी सणांसाठी आणि मराठी मनांसाठी हे ब्रिद वाक्य घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेकडून दहीहंडी उत्सवाचं आज ठाण्याच दमदार आयोजन करण्यात आलं आहे. ठाण्यातील भगवती मैदानामध्ये मनसेच्या वतीने दहीहंडी हा सण साजरा करण्यात येतोय. काल मनसे नेते अविनाश जाधव यांनी ज्या ठिकाणी दहीहंडीचे थर गोविंदा पथकं लावणार आहेत त्या मैदानाची पाहणी केली. यावेळी गोविंदा पथकांसाठी विशेष मॅट वापरण्यात येणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. मात्र याच मनसेच्या दहीहंडी उत्सवाच्या आनंदाला काहिसं गालबोट लागल्याचे पाहायला मिळतंय. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या दहीहंडीत सातव्या थरावरून पडून एक गोविंदा जखमी झाल्याची माहिती मिळतेय. दहीहंडीचे थर लावत असताना सातव्या थरावरून एक गोविंदा पडला आणि जखमी झाला. या घटनेमुळे उत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे. या जखमी गोविंदावर सध्या उपचार सुरू आहेत.
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'

