Thane : ओ साहेब थांबा, कशाला पळताय? पठ्ठा नडला अन् नियमांचे धडे देणाऱ्या पोलिसांनाच भिडला, Video तुफान व्हायरल
ठाण्यात हेल्मेटसाठी एका तरुणाला दंड आकारणाऱ्या वाहतूक पोलिसांनाच नियमांचे उल्लंघन करताना तरुणांनी रोखले. अस्पष्ट नंबरप्लेट असलेल्या गाडीवरून जाणाऱ्या पोलिसांना जाब विचारण्यात आला. सामाजिक माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल झाल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली आणि संबंधित पोलिसांवर दंड आकारण्यात आला.
ठाण्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पोलिसांना दोन तरुणांनी धडा शिकवला आहे. ही घटना ठाण्यातील अंबिका नगर येथे घडली. एका तरुणाला हेल्मेट नसताना 500 रुपये दंड आकारल्यानंतर, याच वाहतूक पोलिसांनी अस्पष्ट नंबरप्लेट असलेल्या आणि सिग्नल तोडून पुढे गेलेल्या गाडीवरून जात असताना तरुणांनी त्यांना थांबवले. सुरुवातीला पोलिसांनी गाडी जप्त केल्याचा दावा केला, तर नंतर ती मित्राची असल्याचे सांगितले.
तरुणांनी प्रश्न विचारत असताना, एका पोलीस कर्मचाऱ्याने वर्दीचा धाक दाखवत तरुणांना हात न लावण्यास सांगितले. हा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेची दखल घेतली. संबंधित गाडी पोलिसांचीच असल्याचे स्पष्टीकरण दिल्यानंतर, दुसऱ्या दिवशी त्याच पोलीस मोटरसायकलवर दंड आकारण्यात आला. लोकांना नियम शिकवण्याआधी पोलिसांनी स्वतः नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे या घटनेने पुन्हा अधोरेखित केले आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

