‘मरेपर्यंत शरद पवारच…’; धाराशिवच्या कार्यकर्त्याची वाय.बी.चव्हाण सेंटरमधून हूकांर
अजित पवार आणि शरद पवार यांनी वेगवेगळ्या बैठका बोलावल्या आहेत. शरद पवार हे यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक घेतील तर अजित पवार हे वांद्रे येथील भुजबळ यांच्या संस्थेच्या सभागृहात मेळावा घेणार आहेत.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या पक्षावर ताबा मिळविण्यासाठी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचअनुशंगाने अजित पवार आणि शरद पवार यांनी वेगवेगळ्या बैठका बोलावल्या आहेत. शरद पवार हे यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक घेतील तर अजित पवार हे वांद्रे येथील भुजबळ यांच्या संस्थेच्या सभागृहात मेळावा घेणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे विभागलेले कार्यकर्ते आणि नेते त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या बैठकीस्थळी पोहचत आहेत. असाच एक कार्यकर्ता ही धाराशिव येथून शरद पवार यांच्या मेळाव्याला यशवंतराव चव्हाण सभागृहाच्या बाहेर पोहचला. ज्याने अनेकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. येथे आलेल्या या गृहस्थांनी गेली 30 एक वर्ष आपण शरद पवार यांच्यासोबतच असल्याचे सांगताना अजित पवार हे काहीही सांगत असतील पण आपली निष्ठा ही शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबतच असल्याचे सांगितले. तर शरद पवार हे जाणता राजा, जाणता नेता असल्याचं म्हटलं आहे. तर मरेपर्यंत आपण शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला आहे.
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....

