भाजपने लावलेले बॅनर चोरीला; शिवसेनेवर केला चोरीचा आरोप
कल्याण लोकसभेत गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलंच युद्ध रंगल्याचं पाहायला मिळतंय. त्यातूनच उल्हासनगर शहरात या दोन्ही पक्षांमध्ये बॅनरवॉर सुरू झाला होता. शिवसेनेने खासदार श्रीकांत शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर लावल्यानंतर भाजपनेही '50 कुठे आणि 105 कुठे? हा आमच्या भाजपचा मोठेपणा.. देवेंद्र फडणवीस साहेब नाम ही काफी है!' असा मजकूर असलेला बॅनर उल्हासनगरच्या 17 सेक्शनच्या चौकात लावला होता.
ठाणे : कल्याण लोकसभेत गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलंच युद्ध रंगल्याचं पाहायला मिळतंय. त्यातूनच उल्हासनगर शहरात या दोन्ही पक्षांमध्ये बॅनरवॉर सुरू झाला होता. शिवसेनेने खासदार श्रीकांत शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर लावल्यानंतर भाजपनेही ’50 कुठे आणि 105 कुठे? हा आमच्या भाजपचा मोठेपणा.. देवेंद्र फडणवीस साहेब नाम ही काफी है!’ असा मजकूर असलेला बॅनर उल्हासनगरच्या 17 सेक्शनच्या चौकात लावला होता. भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कपिल अडसूळ यांनी रात्री 11 वाजताच्या सुमारास हा बॅनर लावला होता. तसंच रात्री 1 वाजता येऊन ते बॅनर लावलेला असल्याची खातरजमा करून गेले होते. मात्र आज सकाळी हा बॅनर गायब झाला आहे. मध्यरात्री उल्हासनगर महापालिका बंद असते. त्यामुळे मध्यरात्री हा बॅनर कोणीतरी चोरून नेल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसंच ‘उत्तर द्यायचं असेल, तर कामातून द्या, चोऱ्या करू नव्हे!’ असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला आहे. हा बॅनर म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या भावना असून शिवसेनेने आम्हाला डिवचल्यास आम्हीही तशाच पद्धतीने यापुढेही प्रत्युत्तर देऊ, असंही कपिल अडसूळ यांनी ठणकावलं आहे.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

