Buldhana | पैनगंगेची पाणीपातळीत वाढल्याने कंटेनर अडकला, तहसीलदार-ठाणेदार मदतीला धावले

बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील उत्तरादा पेठच्या पुलावरुन पाणी वाहत असताना पार्सल घेऊन जाणारा कंटेनर पुलावर अगदी मधोमध अडकला. या कंटेनरमध्ये चालकासह त्यांचा मुलगाही होता.

बुलडाणा : चिखली तालुक्यातील जालना-खामगाव महामार्गावरील उत्तरादा-पेठच्या पुलावर अचानक पैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे जालनाकडे पार्सल घेऊन जात असलेला कंटेनर पुलावर अडकला. यामध्ये दोन जण अडकले होते. मात्र ठाणेदार नागेश चतरकर आणि नायब तहसीलदार हरी वीर यांच्या पुढाकाराने दोघांचेही प्राण वाचले. संबंधित घटना ही मंगळवारी (28 सप्टेंबरला) घडली. बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील उत्तरादा पेठच्या पुलावरुन पाणी वाहत असताना पार्सल घेऊन जाणारा कंटेनर पुलावर अगदी मधोमध अडकला. या कंटेनरमध्ये चालकासह त्यांचा मुलगाही होता. या घटनेची माहिती चिखली तहसीलचे नायब तहसीलदार हरी वीर आणि अमडापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नागेशकुमार चतरकर यांना स्थानिक नागरिकांनी दिली. यावेळी नायब तहसीलदार वीर आणि ठाणेदार चतरकर यांनी समन्वय साधून आपल्या टीम सह घटनास्थळाकडे धाव घेतली. तर त्यांच्या मदतीला दहिगाव येथील तरुण ही धावले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI