CM Uddhav Thackeray | देशाला कंडक्टरसारखा पंतप्रधान हवा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

देशाला कंडक्टरसारखा पंतप्रधान पाहिजे, जो सारखा म्हणेल आगे बढो, आगे बढो, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 74 व्या बेस्ट दिनी बेस्ट उपक्रमाच्या पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बस गाड्याचा आणि पुनर्विकसित माहीम बस स्थानकाचा लोकार्पण सोहळा आज पार पडला.

देशाला कंडक्टरसारखा पंतप्रधान पाहिजे, जो सारखा म्हणेल आगे बढो, आगे बढो, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 74 व्या बेस्ट दिनी बेस्ट उपक्रमाच्या पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बस गाड्याचा आणि पुनर्विकसित माहीम बस स्थानकाचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, “1874 ते 2021 हा बेस्टचा मोठा प्रवास आहे. पहिली बेस्ट ही घोडगाडीत होती. अजून ट्रामच्या आठवणी आहेत. मला माँ आणि बाळासाहेब ट्राममधून फिरायला घेऊन जात असत. पुढे यात बदल होत गेले. आता ही इलेक्ट्रिकल बस आली आहे. मी शाळेत सुद्धा बेस्ट बसने गेलो होतो. बेस्ट ही सेवा देत आहे”.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI