भोंदूबाबाचे अनेक कारनामे उघड, काय म्हणताहेत मिरगावचे गावकरी ?
नाशिक भोंदूबाबा अशोक खरात याच्या दहशतीने गावात कोणतेही व्यवहार करताना गावकरी घाबरत होते, मिरगावातील ईशान्यश्वेर महादेवाच्या मंदिर संस्थानाचा वापर करुन लोकांच्या श्रद्धेचा वापर करीत या बाबाने आपले प्रस्थ वाढवल्याचे समोर आले आहे.
भोंदूबाबा अशोक खरात याला अटक झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. या भोंदूबाबाच्या दर्शनाला मिरगावात अनेक नेते मंडळी येत होती. अगदी कलेक्टरपासून बडी अधिकारी मंडळी येथे बाबाच्या सेवेला हजर असायची. मिरगावातील अनेक ग्रामस्थांना अशोक खरात याने दहशतीखाली ठेवले होते. सुरुवातीला ईशान्यश्वेर महादेवाच्या मंदिर संस्थानात गावातील मंडळी पूजेसाठी दर सोमवारी आणि महाशिवरात्रीला जमायची. नंतर बाबाचे कारनामे कळाल्यानंतर या लोकांनी तेथे जाणे बंद केले. गावातील अनेक तरुणांवर खोटे आरोप टाकून त्यांना अटक करायला देखील भाग पाडण्यात या बाबाचा हात होता असे मिरगावचे रहिवासी सांगत आहेत. आता या ईशान्यश्वेर महादेवाच्या मंदिर संस्थानाचे विश्वस्थ मंडळ बरखास्त करुन गावाच्या ताब्यात ते द्यावे अशी मागणी गावकरी करत आहेत.
भोंदूबाबाचे अनेक कारनामे उघड, काय म्हणताहेत मिरगावचे गावकरी ?
जे भोंदूबाबाला शरण गेले त्या सर्वांनीच राजीनामा द्यावा - यशोमती ठाकूर
भोंदूबाबा खरातचा पीए नीरज जाधव कोर्टात हजर होणार? आणखी बाहेर पडणार?
...तर तटकरे आणि प्रभृतींनी अजितदादांचा वारसा सांगू नये - सुषमा अंधारे

