सलग दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांसोबत एकत्र येणं टाळलं? देवेंद्र फडणवीस अद्याप नाराज?
VIDEO | मुख्यमंत्र्यांसोबतचा कार्यक्रम फडणवीस यांनी टाळला? उपमुख्यमंत्री कार्यालयानं काय केलं खंडन?
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा कार्यक्रम हा सलग दुसऱ्या दिवशी टाळण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत असताना दिसतेय. दरम्यान, इतकेच नाहीतर देवेंद्र फडणवीस नाराज आहेत का असा सवालही उपस्थित केला जात आहे. शिवसेनेकडून काल महाराष्ट्रातील सर्व मराठी वृत्तपत्रात एक जाहिरात देण्यात आली होती यामध्ये देशात मोदी अन् महाराष्ट्रात शिंदे अशा आशयाची जाहिरात छापण्यात आली होती. यासह मुख्यमंत्रीपदासाठी 26.1 टक्के जनतेची एकनाथ शिंदे यांना तर 23.2 टक्के जनतेची पसंती देवेंद्र फडणवीस यांना असल्याचेही त्यात म्हटलं होतं. त्यामुळे भाजपासह देवेंद्र फडणवीस नाराज असल्याच्या चर्चाही होताना पाहायला मिळाल्या. तर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आजचे सर्व दौरे ही रद्द केले होते. यासगळ्यांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून या होणाऱ्या चर्चांचं खंडन करण्यात आले आहे. प्रकृतीच्या कारणामुळे फडणवीस यांनी कोल्हापूर दौरा रद्द केला. त्यांना डॉक्टरांनी विमान प्रवास न करण्याचा सल्ला दिला. तसेच मोठ्या सभा आणि विशेषतः विमान प्रवास टाळण्यासह आरामाचा सल्लाही त्यांनी डॉक्टरांकडून देण्यात आला आहे.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

