AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narendra Modi | …तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येणारच, इतिहास बदलण्याच्या आरोपावर मोदींचं उत्तर

Narendra Modi | …तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येणारच, इतिहास बदलण्याच्या आरोपावर मोदींचं उत्तर

| Updated on: Feb 08, 2022 | 3:33 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी आज राज्यसभेत काँग्रेसवर (congress) जोरदार शाब्दिक हल्ला केला. विशेषतः शरद पवारांचे कौतुक करत राहुल गांधी आणि गांधी परिवारावर जोरदार टोलेबाजी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज राज्यसभेत काँग्रेसवर (Congress) जोरदार शाब्दिक हल्ला केला. विशेषतः शरद पवारां(Sharad Pawar)चे कौतुक करत राहुल गांधी आणि गांधी परिवारावर जोरदार टोलेबाजी केली. फारुख अब्दुलांचं सरकार कुणी अस्थिर केलं होतं? चौधरी देवीलाल यांचं सरकार कुणी अस्थिर केलं होतं? चौधरी चरणसिंगची सरकार कुणी अस्थिर केलं होतं? पंजाबमध्ये सरदार बादलसिंग यांचं सरकार कुणी बरखास्त केलं होतं? महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी कुणाचा उपयोग केला होता? कर्नाटकात हेगडेंचं सरकार कुणी बरखास्त केलं होतं? 50 वर्षापूर्वी डाव्यांचं सरकार कुणी पाडलं होतं? एमजीआरचं सरकार कुणी डिसमिस केलं होतं? आंध्रमध्ये एनटीआरचं सरकार कुणी बरखास्त केलं होतं? केंद्र सरकारचं ऐकत नाही म्हणून मुलायम सिंह यादव यांना कोणत्या पक्षाने त्रास दिला होता? अशा सवालांच्या फैरीच त्यांनी झाडल्या. विरोधक नेहमी इतिहास बदलण्याचे आरोप करतात. त्याल्याही त्यांनी उत्तर दिले. शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव येणारच, असे हसत-हसत सांगितले.