Gajanan Kale | टोमणे सभा संपत नाही तर आता टोमणा अग्रलेख पण सुरु झालाय, मनसेचे नेते गजानन काळेंची टीका

शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनाच्या अग्रलेखावर मनसेचे नेते गजानन काळेंनी टीका केली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शुभम कुलकर्णी

May 16, 2022 | 11:38 AM

मुंंबई : शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनाच्या अग्रलेखावर (Editorial of Saamana)मनसेचे नेते गजानन काळेंनी (mns gajanan kale) टीका केली आहे. टोमणे सभा संपत नाही तर आता टोमणा अग्रलेख (Editorial) सुरू झालाय, अशी टीका गजानन काळे यांनी केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की,  ‘टोमणे सभा’संपत नाही तर आता “टोमणा अग्रलेख” पण सुरू झालाय. ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव मराठी दैनिक हा मथळा बदलून आता सत्तेसाठी हिंदुत्वाला तिलांजली देणारे आणि सोयीनुसार हिंदुत्वाची लाईन घेणारे एकमेव दैनिक असे करावे’ असं त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें