Special Report | मालकांआधी चोरांचा गृहप्रवेश, सिडकोतले ‘चोर’ कोण?

हा धक्कादायक प्रकार दक्ष नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी चोरट्याला शिताफीने पकडले. या प्रकारामुळे रहिवाशांमध्ये मात्र भितीचे वातावरण पसरले असून महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

नवी मुंबई : घणसोली येथील सिडको योजनेतील मेघमल्हार गृहसंकुलात सध्या चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. केवळ रात्रीच नव्हे तर दिवसाढवळ्या इमारतींमध्ये चोऱ्या घडत आहेत. चोरीचे सत्र सुरू असतानाच चोरट्याने चक्क सिडकोच्या ताब्यातील घरांच्या चाव्याही मिळवल्या आणि बंद घरातील ऐवज लंपास करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार शुक्रवारी मध्यरात्री घडला. हा धक्कादायक प्रकार दक्ष नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी चोरट्याला शिताफीने पकडले. या प्रकारामुळे रहिवाशांमध्ये मात्र भितीचे वातावरण पसरले असून महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. सिडकोने अनेक घरांचा ताबा रहिवाशांना दिला असला तरी बहुतांश घरांच्या डुप्लिकेट चाव्या अजूनही विकासक शिर्के कंपनीच्या अभियंत्यांजवळ आहेत. त्यामुळे चोर डुप्लिकेट चाव्यांवरही डल्ला मारून रहिवाशी राहत असलेल्या घरांत शिरकाव करू शकतात, अशी भिती निर्माण झाली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI