‘मग राष्ट्रवादीत ही फूट नव्हे तर काय?; संजय राऊत यांनी थेट सवाल करत केलं मोठं वक्तव्य
VIDEO | माझ्या माहिती प्रमाणे राष्ट्रवादीत फूट पडली अन् अजित पवार गटाने शरद पवारांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली आहे. याला आम्ही फूट मानतो, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलं मोठं वक्तव्य
मुंबई, २५ ऑगस्ट २०२३ | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार हे आमचेच नेते असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. तर राष्ट्रवादीत फूट पडलेली आहे की नाही? असा सवाल केला जात आहे. यावरच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आपले मत व्यक्त केले आहे. शरद पवार हे महाविकास आघाडीचे नेते आहेत. इंडिया अलायन्सचे ते प्रमुख घटक आहेत. या महाराष्ट्रात वैचारिक लढा सुरू आहे. राष्ट्रवादीत फूट पडली की नाही हे राज्यातील जनता ठरवेल. माझ्या माहिती प्रमाणे राष्ट्रवादीत फूट पडली आहे. जशी शिवसेनेतून फुटून एक गट वेगळा झाला. पक्षाची भूमिका, पक्षप्रमुखांचा विचार बाजूला ठेवून त्यांनी भाजपबरोबर हातमिळवणी केली. हा पक्ष द्रोह आहे. त्यामुळे आम्ही त्यांची हकालपट्टी केली आहे. ही फूट आहे. त्याच पद्धतीने राष्ट्रवादीतून एक गट फुटला आणि पक्षाच्या विचारधारेविरुद्ध भाजपशी हातमिळवणी केली. त्यानंतर त्या पक्षाने अजित पवार यांच्यासह काही नेत्यांची हकालपट्टी केली. त्याला फूट नाही म्हणायचे तर काय म्हणायचे. ही फूटच आहे, असं संजय राऊत म्हणाले. या राज्यात राष्ट्रवादीचे दोन अध्यक्ष आहेत. एक जयंत पाटील आणि दुसरे सुनील तटकरे. ही फूट नाही का? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला. अजित पवार गटाने शरद पवारांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली आहे. याला आम्ही फूट मानतो, असेही ते म्हणाले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

