पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावर अजितदादांचा पुन्हा एकदा शिक्कामोर्तब; म्हणाले… ही काळ्या दगडावरची रेघ
तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. या चार राज्यांपैकी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये भाजपचं कमळ फुललं आहे. या निकालावर भाष्य करताना अजित पवार नेमकं काय म्हणाले?
मुंबई, ३ डिसेंबर २०२३ : तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. या चार राज्यांपैकी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये भाजपचं कमळ फुललं आहे. दरम्यान या चार राज्याच्या निकालावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील भाष्य केले आहे. यावेळी अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावर अजित पवार यांचा पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार म्हणाले, देशात गेली ३२ वर्ष मी काम करतोय. आज उपमुख्यमंत्री म्हणून बोलत असताना देश पातळीवर कुणी काही म्हटलं तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे आणि ते आपल्याला नाकारता येणार नाही, असे अजितदादा स्पष्टच म्हणाले. तर चार राज्यातील भाजपच्या विजय हा याचाच परिणाम असल्याचे पाहायला मिळत असल्याचेही त्यांनी म्हटले.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

