2019 ला शब्द कुणी मोडला हे त्यांनी सांगावं – संजय राऊत

सगळीकडे ढवळाढवळ करण्याचा अधिकार विश्व प्रवक्त्याना कुणी दिला असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांना लगावला आहे. शिवसेनेने संभाजी छत्रपतींना राज्यसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी महाराजांच्या वंशज दिलेला शब्द पाळणे हे शिवसेनेचे काम असल्याचे म्हटले होते.

प्राजक्ता ढेकळे

|

May 28, 2022 | 5:13 PM

मुंबई – चंद्रकांत पाटील हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत का? 2019 ला शब्द कुणी मोडला हे त्यांनी सांगावं असे थेट आव्हान शिवसेना नेते संजय राऊत(sanjay Raut) यांनी केला यांनी केला आहे. राऊतांच्या या प्रश्नाला चंद्रकांत पाटील यांनीही उत्तर दिलेले आहे. मी शिवाजी महाराजांचा वंशज नाही हे सामान्य ज्ञान आहे असे त्यांनी म्हटले आहे. सगळीकडे ढवळाढवळ करण्याचा अधिकार विश्व प्रवक्त्याना कुणी दिला असा टोलाही चंद्रकांत पाटील (Chandrakant patil)  यांनी राऊत यांना लगावला आहे. शिवसेनेने संभाजी छत्रपतींना राज्यसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी महाराजांच्या वंशज दिलेला शब्द पाळणे हे शिवसेनेचे(Shivsena) काम असल्याचे म्हटले होते. एवढंच नव्हेतर शब्द पाळू शकत नाहीत नाही तर पक्षाच्या नावात शिव लावण्याचा नैतिक अधिक नसल्याचे म्हणत टीका केली होती.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें